*बचती पेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणुकीची आवश्यकता . मोनिका बलदवा*
मिरज : कन्या महाविद्यालय मिरज येथे अर्थशात्र आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम अंतर्गत 'शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या संधी' या विषयावर आर्थिक सल्लागार सौ. मोनिका बलदवा ( जयसिंगपूर ) यांचे व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानात पुढे बोलताना मोनिका बलदवा मॅडम म्हणाले की, प्रत्येकानी स्वतः ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेळीच पैश्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. सुयोग्य पद्धतीने केलेले नियोजन हेच भविष्य काळातील गरजा पुर्ण आणि अडचणी दूर करु शकते. सर्वांनी बचती पेक्षा योग्य ठिकाणी गुतवणुकीसाठी अग्रक्रम दिले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. गुंतवणुकी साठी बँक डीपॉजीट, सोने आणि रियल इस्टेट इ. पारंपरिक मार्गाचा विचार न करता शेअर, म्युचवल फंड अशा आधुनिक गुंतवणुकीच्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. यामध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर ठरतात असे त्यानी स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री.उल्हास माळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुजाता आवटी यांनी केले तर आभाराचे काम वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शर्वरी कुलकर्णी मॅडम यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी कन्या महाविद्यालयातील प्राध्यापक विनायक वनमोरे व प्रा.शेळके सर, प्रा नाईक मॅडम. आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment