अमर्त्य सेन जीवन चरित्र - Amartya Sen Biography In Marathi
भारतात सांप्रदायिक भेदभावाची सुरुवात झालेली होती. गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये सांप्रदायिक हिंसा वाढली. देशाची ही स्थिती बघून अमर्त्य सेन - Amartya Sen यांनी दृढ संकल्प केला की ते मनुष्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी काम करतील.
शांती निकेतन मधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1951 मध्ये प्रेसिडेंसी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथे प्राध्यापक हे स्वतःच्या विषयाविषयी दक्ष होते आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन जोश निर्माण करत होते. या कॉलेज मध्ये अमर्त्य कुमार यांच्या येण्याचा उद्देश होता की त्यांना अर्थशास्त्रात प्राविण्य मिळवायचे होते. हेच Amartya sen यांच्या जीवनाचे स्वप्न होते.
अमर्त्य सेन यांची माहिती -
जन्म (Birthday) : 3 नोव्हेंबर 1933, शांती निकेतन, कोलकाता
वडील (Father Name) : आशुतोष
आई (Mothers Name) : अमिता
शिक्षण (Education) :
1951 मध्ये प्रेसिडेंसी कॉलेज मध्ये प्रवेश
1953 मध्ये पदवीधर झाले.
विवाह (Wife Name) :
पहिला - नवनीता यांच्या सोबत 1956 मध्ये
दुसरा - ईवा यांच्या सोबत 1985 मध्ये
तिसरा - एक्सा रॉथशील यांच्या सोबत
अमर्त्य सेन यांची बायोग्राफी - Biography Of Amartya Sen in Marathi
Amartya sen यांचा मुख्य विषय हा अर्थशास्त्र होता आणि त्यांना या विषयाप्रति खूप आवड होती. अमर्त्य कुमार यांना अशी अर्थव्यवस्था हवी होती ज्याचा आर्थिक लाभाचा भाग हा गरीब लोकांना देखील मिळू शकेल. अमर्त्य कुमार सेन यांचा झोक हा डाव्या विचारसरणीच्या राजकारणाकडे होता.
1943 मध्ये बंगाल मध्ये दुष्काळ पडला होता, त्याकाळात 25 लाख हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले. त्याची सर्वात मोठी समस्या ही ब्रिटिश सरकारची वितरण प्रणाली ही कमजोर असणे ही होती. त्या वेळी जगातील अनेक अर्थशास्त्रज्ञ हे वेगवेगळ्या आर्थिक पद्धती शोधण्यात गुंतलेले होते.
त्यांचा उद्देश हा फक्त विकसित देशांना लाभ पोहोचवणे इतका होता. त्याशिवाय अनेक अर्थतज्ञ हे विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. अमर्त्य कुमार यांनी असे काही ठोस उपाय निर्माण केले ज्यांच्यामुळे मनुष्याची गरिबी आणि दारिद्र्य हे समूळ नष्ट होऊ शकेल.
त्यांनी पुढे जाऊन जगाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अभ्यास केला. याच्या आधारे त्यांनी एक निष्कर्ष काढला होता की , जगात अरब संख्येत असे लोक आहेत ज्यांचे जीवन हे दुःख आणि दारिद्र्याने भरलेले आहे. भारतात असे लोक अधिक आहेत. इतिहास देखील सांगतो आहे की बाहेरून आलेले परकीय राज्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी त्या देशातील सामान्य माणसाची कंबर मोडली आहे.
आर्थिक संकट हे त्यांच्या खांद्यावर बोजा बनून आहे. हा बोजा ओढत ओढत कोणाला माहीत किती पिढ्या गेल्या आहेत आणि पुढे येणाऱ्या किती पिढ्या याच्या खाली दबून खचतील. Amartya Sen यांनी 1953 मध्ये प्रेसिडेंसी कॉलेज मधून अर्थशास्त्र मधील पदवी मिळवली.
त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे आले. तिथे केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इथे त्यांना मिखाईल निकल्सन, चार्ल्स फिन्स्टिन, लाल जयवर्धने आणि मेहबूब अली हक यांची सोबत मिळाली. तिथे दोन गट बनले होते, मोर्क्सवादी मारीस डाब, उदारवादी डेनिस रोबर्टसन! आणि महान अर्थतज्ञ पियरो साफा इथे सेवा देत होते.
हे तिन्ही महान व्यक्ती अमर्त्य कुमार सेन यांच्यासाठी वरदान ठरले. त्यांनाच आदर्श ठेवत अमर्त्य यांनी अर्थशास्त्रातील बारकावे चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. त्यांनी जगभरातील अर्थव्यवस्थाचा अभ्यास केला. त्यांनी शोधासाठी ' डी चॉईस ऑफ टेक्निकस' हा विषय निवडला. हा विषय समाजवादी अर्थव्यवस्थेशी संबंधित होता. मॉरिस डाब आणि एक दुसरे प्रोफेसर जॉन रॉबिन्सन यांनी अमर्त्य कुमार यांच्या विषयावर आनंद व्यक्त करत त्यांना मदत करण्याचे वाचन देखील दिले. अमर्त्य कुमार यांनी या विषयावर खूप चांगल्या प्रमाणे मेहनत करत सर्व प्रोफेसर ला देखील आश्चर्यात टाकले.
एका वर्षात त्यांचे शोधकार्य हे खूप पुढे गेले होते. शेवट ते कॉलेज मधून मोठी सुट्टी घेत भारतात आले. इथे श्री ए के दासगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोध पुढे सुरू ठेवला. ते गरीब लोकांच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन करत होते आणि अमर्त्य सेन यांच्यासारखा विद्यार्थी शोधकर्ता मिळाल्याने त्यांना आनंद झाला.
वर्ष 1956 मध्ये अमर्त्य कुमार यांना जाधवपूर विश्वविद्यालयात अर्थशास्त्राचे प्रवक्ते म्हणून निवडले गेले. त्यांच्यातील असाधारण क्षमता लक्षात घेता त्यांना पुढे जाऊन विभाग प्रमुख बनवले गेले. अमर्त्य कुमार हे
निर्धारित कालावधीच्या आत शोध पूर्ण करून इंग्लंडला गेले. अमर्त्य कुमार यांनी आपल्या शोध विषयाची पार्श्वभूमी मजबूत बनवण्यासाठी तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र यांचा अभ्यास केला. तत्वज्ञान या विषयाविषयी त्यांना आवड होती.
1963 मध्ये अमर्त्य कुमार यांचे दिल्लीला येणे झाले. इथे त्यांनी दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विश्व विद्यालय येथे सेवा दिली. दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथील विद्यार्थ्यांची रुची ही सामाजिक हित विषयात जास्त होती. हा विषय अमर्त्य कुमार यांचा देखील मुख्य विषय होता. याचा संबंध गरिबी, बेरोजगारी, असमानता आणि आर्थिक संकटाशी होता.
त्यासोबत ते एका पुस्तकाच्या तयारीत देखील होते. त्यांच्या पुस्तकाचे नाव ' कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर' आहे. याचे प्रकाशन हे 1979 साली झाले होते. या पुस्तकात सामाजिक हित या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर नजर टाकली होती. अमर्त्य कुमार यांना जेवहा भारतात जाधवपूर विश्वविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख बनवण्यात आले तेव्हाच त्यांचा विवाह हा नवनीता देवी यांच्याशी झाला. दोघांच्या विचारांत मतभेद निर्माण झाले. अमर्त्य कुमार कधी भारतात तर कधी इंग्लंडला जात असत.
भारतातून ते इंग्लंडला गेल्यानंतर ते हॉवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये अध्यापन करायला लागले. मोकळ्या वेळेत त्यांचे लेखन कार्य देखील सुरू होते. इंग्लंड मध्ये राहून ते त्यांच्या बायकोच्या भावनांची कदर करू शकले नाही. पुढे त्यांच्यात इतका वाद वाढला की त्यांनी घटस्फोट घेतला. नवनीत यांची दोन मुले आहेत- मुलीचे नाव अंतरा (Amartya Sen Daughter) आणि मुलगा नंदन आहे.
1971 मध्ये ते ब्रिटिश मुलगी ईवा कोर्लोनी यांच्या संपर्कात आले. अमर्त्य कुमार आणि ईवा यांचे विचार मिळते जुळते होते. ईवा यांचे विचार आणि सामाजिक भावना यांनी प्रभावित होत अमर्त्य कुमार यांनी त्यांच्याशी विवाह केला होता. गरीब लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या अर्थव्यवस्था शोधणे हे अमर्त्य कुमार यांचे ध्येय होते. परंतू ईवा त्यांना आयुष्यभर साथ देऊ शकल्या नाहीत. ईवा यांना मुलगी इंदिराणी आणि एक मुलगा कबीर यांना जन्म दिला. त्यानंतर 1985 मध्ये कॅन्सर आजाराने त्यांचे निधन झाले.
पुढे अमर्त्य कुमार हे मुलांना घेऊन अमेरिकेत गेले. ते 'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, हॉवर्ड, स्टेनफोर्ड आणि प्रिन्सटन' अशा अनेक विद्यापीठांमध्ये सेवा देत होते. अमर्त्य कुमार हे त्यांच्या मुलांची विशेष काळजी घेत असत. अमर्त्य कुमार हे अमेरिकेत राहून देखील इंग्लंड मधील अनेक विश्वविद्यालयाशी आणि संस्थेशी जोडले होते. जेव्हा त्यांना कोणी मानवतावादी अर्थतज्ञ म्हणत तेव्हा त्यांना आनंद होत असे.
अमर्त्य कुमार यांनी अर्थशास्त्रावर जवळपास 215 शोध लिहिले आहेत. त्यांनी अर्थशास्त्र शी निगडित शोधांवर 24 पुस्तके लिहिली. ही सर्व पुस्तके विश्वभरात प्रसिद्ध आहेत. समाजवादाच्या क्षेत्रात उचललेल्या त्यांच्या ठोस पावलांना जगभरातील अर्थतज्ञांनी स्वागत केले.
अमर्त्य कुमार देश विदेशातील वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये आपले लेख लिहीत होते. 1982 मध्ये 'चॉईस मेजरमेंट अँड रिसोर्सेस' नावाची एक पुस्तिका प्रकाशित झाली. त्यांनी भारतातील स्त्री पुरुषांची कार्य क्षमता आणि लिंगाच्या आधारावर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या भेद भावात आधारित संख्यांचा अभ्यास केला. गरिबी आणि दुष्काळ यावर अमर्त्य सेन यांनी केलेला अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला. 1998 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कारासाठी निवडले गेले.
अमर्त्य कुमार यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला फोन केला, त्यांच्या आईला विश्वास बसत नव्हता की त्यांच्या मुलाला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. जेव्हा सर्व वृत्तपत्रांमध्ये नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव आले तेव्हाच त्यांच्या आईला त्या गोष्टीवर विश्वास बसला.
अमर्त्य कुमार यांनी त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या रकमेचा वापर हा एक ट्रस्ट बनवण्यासाठी केला,ही ट्रस्ट तो पैसा हा भारतातील गरीब मुलांच्या परदेशातील शिक्षणासाठी करत असते. नोबेल पुरस्कारात मिळालेल्या 5 करोड रुपयांचा अमर्त्य कुमार यांनी व्यक्तिगत जीवनात वापर केला नाही. त्यांच्या या कार्याने त्यांना संपूर्ण जगभरातून स्तुती मिळाली.
अमर्त्य कुमार यांना कल्याणकारी अर्थव्यवस्थेचे जनक म्हणले जाते. त्यांना Best Economist of India म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी लोककल्याणकारी अर्थव्यवस्था संपूर्ण जगाच्या समोर आणली. अमर्त्य कुमार हे पहिले असे अर्थतज्ञ आहेत ज्यांचे लक्ष हे गरिबांना दारिद्र्यातून मुक्ती देणे होते. त्यांचे म्हणणे होते की भारतात गरिबीचे मुख्य कारण हे शिक्षणाचा अभाव आणि साधन संपत्तीची कमतरता आहे.
त्यांनी स्वतःच्या भाग्याला दोष देण्यापेक्षा काम करण्याकडे जास्त लक्ष दिले. अमर्त्य कुमार यांचे विचार आहे की जगात गरिबीचे कारण हे शिक्षणाची कमतरता हेच आहे. पैसे कसे कमावता येतील, याचे ज्ञान देखील आपल्याला शिक्षणातून होते. शिक्षणाने अज्ञानरुपी अंधार नष्ट करता येतो. शिकलेला व्यक्ती हा अंधविश्वास न ठेवता धर्माच्या नावावर रस्ता भटकत नाही.
शुद्ध आचरण आणि शुद्ध व्यवहार करणारे व्यक्ती हे स्वतःला अज्ञानाच्या धोक्यापासून वाचवू शकता. असे लोक आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. या आधारे सरकारने शिक्षण हे सक्तीचे करायला हवे, जेणेकरून समाज हा शिक्षित बनेल आणि देश विकसित होईल. संपूर्ण विश्व आजही नव नवीन अर्थशास्त्रातील शोध घेत आहे.
अमर्त्य सेन यांची पुस्तके - Amartya Sen Books
1979 मध्ये कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर
1982 मध्ये चॉईस वेलफेअर मेजरमेंट अँड रिसोर्सेस
जवळपास एकूण 24 पुस्तके त्यांनी लिहिली.