*▪️सायमन कुझनेट्स* (30 एप्रिल 1901-8 जुलै 1985) एक अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांना १९७१ चे अर्थशास्त्रातील तिसरे नोबेल पारितोषिक मिळाले.
१९५३ साली प्रकाशित झालेल्या "शेयर्स ऑफ अपर इन्कम ग्रूप्स इन इन्कम अँड सेव्हिंग्स" (उच्चवर्गाचा आर्थिक उत्पन्नात व संपत्तीत वाटा) या त्यांच्या शोधनिबंधाकरिता व १९५५ साली त्यांनी डेट्रॉइट शहरात त्यांनी दिलेल्या “इकॉनॉमिक ग्रोथ अँड इन्कम इनइक्वालिटी” (“आर्थिक वाढ व आर्थिक उत्पन्नातील विषमता”) या त्यांच्या व्याख्यानाकरीता कुझनेट्स विशेष प्रसिध्द आहेत. यात त्यांनी खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरूवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच आर्थिक समता अस्तित्वात येते असा विचार मांडला. या कार्याबद्दल त्यांना 1971 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
No comments:
Post a Comment