Company Secretaries of India यांच्या वतीने Carrier awareness Programe या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
कन्या महाविद्यालय मिरज मध्ये दिनांक 16/08/2024 रोजी भारतीय कंपनी सचिव संस्थान (Company Secretaries of India) यांच्या वतीने Carrier awareness Programe या विषयावर एक दिवसीय कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या सुरवातीला CS श्री अभिजित रोकडे यांनी CS परीक्षेच्या अभ्यासक्रम व त्यांच्या पायऱ्या या संदर्भात मार्गदर्शन केले. CS श्री खटावकर सर यांनी मार्गदर्शन करताना इंग्लिश भाषेबाबत येणारे अडथळे व CS परीक्षेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना स्वतःचे करिअर कसे घडवता येईल याविषयी मत मांडले. CS माधुरी अंकलखोपे यांनी घरी राहूनही मुलींना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत CS मधून स्वतःचे करिअर घडवता येते व पैसा कमावता येतो असे मार्गदर्शन केले. CS श्री ओकार बोंगाळे यांनी CS परीक्षा व त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
श्री अमितकुमार गुप्ता यांनी विधार्थीनींनच्या शंकानचे निरसन केले. या कार्यक्रमाचे नियोजन स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख व CS परीक्षा प्रमुख प्रा. विनायक वनमोरे यांनी केले. आभार डॉ. स्वाती माळकर यांनी मानले. डॉ शबाना हळंगळी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.